महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coronavirus Guidelines in Aurangabad : औरंगाबादमध्ये नवे निर्बंध लागू, वाचा काय आहेत, अन्यथा... - औरंगाबाद कोरोना अपडेट

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक ( Corona outbreak in Maharashtra ) पाहायला मिळतोय. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता औरंगाबादेत प्रशासनाने नियम, निर्बंध अधिक कडक केले आहेत.

औरंगाबाद
Aurangabad

By

Published : Jan 6, 2022, 9:50 AM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध ( Coronavirus Guidelines in Aurangabad ) लावण्यात येणार आहेत. त्यात सध्याची वाढत जाणारी रुग्ण संख्या पाहता रुग्णालयांनी बेड्सची संख्या वाढविण्यावर भर द्यावा. रुग्णांना गृह विलगीरणात राहायचे असल्यास घरातील इतर सर्व सदस्यांचे लसीकरण बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा टास्क फोर्स आणि शहरातील खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांची बैठक पार पडली. यावेळी मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलिस अधिक्षक निमितकुमार गोयल, उपायुक्त डॉ. उज्जवला वनकर, वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी तसेच खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर्स उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी यावेळी शहरातील सर्व रुग्णालयांतील उपलब्ध बेड्सचा आढावा घेतला. तसेच ऑक्सिजनची संभाव्य मागणी लक्षात घेता सर्व ऑक्सिजन प्रकल्पाची देखील सविस्तर आढावा घेतला.

असे असतील नवे नियम -

  1. कोविड टेस्ट positive आल्यावर रुग्णाला गृह विलगीकरणात (Home isolation) राहायचे असेल तर घरातील सर्व सदस्यांचे लसीकरण (दोन्ही डोस) पूर्ण असणे बंधनकारक.
  2. घरातील इतर सदस्यांनी Home Quartine राहणे बंधनकारक (इतर सदस्यांनी बाहेर फिरू नये) गर्दीवर नियंत्रण ठेवा.
  3. हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. सभा/ कार्यक्रमहॉटेल/ रिसॉर्ट मधील गर्दीचे चित्रीकरण करा.
  4. हुर्डापार्टीवर पूर्णपणे निर्बंध/ हुरडापार्टी सुरू असल्यास पोलीस कार्यवाही करणार.
  5. शहराबाहेरील फार्म हाऊस/ रिसॉर्टवर बंदी. सुरू दिसल्यास पोलीस कार्यवाही होणार
  6. मंगल कार्यालयाने आगामी लग्नाच्या booking ची माहिती प्रशासनाला कळवावी. 50 पेक्षा जास्त गर्दी होणार नाही याचे मंगल कार्यालयाने Under taking द्यावे लागणार. नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस कार्यवाही होणार.
  7. आजपर्यंत 1875 वाहन चालकांचे license रद्द केले. यापुढे ही कार्यवाही सुरू राहणार. कार्यवाही झाल्यास वाहन विक्री करता येणार नाही.
  8. लसीकरण आणि मास्क शिवाय पेट्रोल नाही सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्दशहर आणि ग्रामीण भागातील लग्नामध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भेटी द्या.

ABOUT THE AUTHOR

...view details