महाराष्ट्र

maharashtra

नागरिकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हाधिकारी घेणार धर्मगुरुंचा आधार

By

Published : Sep 29, 2020, 5:14 PM IST

आपल्या देशामध्ये आजही धर्मगुरुंच्या बोलण्याला खूप किंमत आहे. लोकसंख्येचा एक मोठा भाग त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करतो. याचाच फायदा कोरोना जनजागृतीसाठी होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन औरंगाबादचे जिल्हाधिकारी धर्मगुरुंची मदत घेणार आहेत.

Sunil Chavan
सुनील चव्हाण

औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिक अद्यापही याविषयी गंभीर नसल्याचे दिसत आहे. नागरिक मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे गांभीर्याने पालन करत नाहीत. त्यामुळे नागरिकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हाधिकारी आता धर्मगुरुंची मदत घेणार आहेत.

नागरिकांना शिस्त लावण्यासाठी धर्मगुरुंची मदत घेतली जाणार आहे

नागरिक धर्मगुरुंनी सांगितलेले ऐकतात. त्यामुळे धर्मगुरुंचा आधार घेऊन नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला. सर्व धर्मीय गुरुंची भेट घेऊन त्यांना जनजागृती करण्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दररोज किमान तीनशे नवीन रुग्ण आढळतात. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 33 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. बाजारात होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोविड-19बाबत जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. मात्र, बहुतांश नागरिक याकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे आता नागरिकांना जागरूक करण्यासाठी धर्मगुरुंचा आधार घेण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details