औरंगाबाद - तिकीट वाटपावरून झालेल्या वादात इच्छुक उमेदवाराने बहुजन समाज पार्टीच्या संपर्क प्रमुखाला बेदम चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मुकुंदवाडी परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये ही घटना घडली असून, या प्रकरणी स्थानिक पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
औरंगाबाद मंडळाचे संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव खंदारे यांनी फुलंब्री मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी तीन लाख रुपये घेतल्याचा आरोप गणेश निकाळजे यांनी केला. तसेच माझ्यासह आणखी काही जणांकडून देखील पैसे घेण्यात आले असून, त्यातील काही लोकांनी खंदारेंसह त्यांच्या चालकाला चोप दिल्याचे गणेश निकाळजे यांनी सांगितले.
फुलंब्री मतदार संघातून उमेदवारी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी मुंबईत बोलावून 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप भारतीय समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष गणेश निकाळजे यांनी केला आहे. तसेच एवढी रक्कम नसल्याने हा व्यवहार 6 लाख रूपयांवर ठरला. यामधील पाहिले तीन लाख रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता दुसऱ्यालाच उमेदवारी देत असल्याचा आरोप भारतीय समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष गणेश निकाळजे यांनी केला आहे.