महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चांद्रयान-2 मोहीम जगाला नवीन दिशा दाखवणार : खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर - ISRO

चांद्रयान-2 मोहीम जगाला नवी दिशा देणारी तसेच देशासाठी अभिमानाची असल्याचे मत एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले.

खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर

By

Published : Jul 14, 2019, 7:26 PM IST

Updated : Jul 15, 2019, 12:33 AM IST

औरंगाबाद-चांद्रयान-2 मोहीम जगाला नवी दिशा देणारी असेल असे मत खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले. भारत हे चांद्रयान--2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरवणार असून आज पर्यंत या भागात कोणत्याही देशाचे यान उतरलेले नाही. अशी मोहीम राबवणारा भारत जगातला पहिला देश असेल. त्यामुळे जगाला अभ्यासासाठी हे संशोधन उपयोगी पडेल, असे मत एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले.

एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर

या आधी भारताने चंद्रावर 2008 मध्ये चांद्रयान--१ पाठवले होते. त्यानंतर 2014 मध्ये मंगळयान यशस्वीरित्या पोहोचवले. तब्बल पाच वर्षानंतर चांद्रयान-2 पाठवून चंद्राच्या दक्षिण गोलार्धात भारताचा झेंडा फडकवणार आहोत. त्यामुळे देशासाठी हा अभिमानाचा दिवस असणार असल्याचे मत श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले.

सोमवारी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी भारत चंद्राकडे चांद्रयान -2 हे यान पाठवणार आहे. तसे पाहिले तर हे भारताचे पहिले यान असेल जे चंद्रावर उतरणार आहे. 2008 मध्ये चांद्रयान-1 या यानाने चंद्राभोवती प्रदक्षिणा मारून माहिती गोळा केली होती. मात्र, आता 11 वर्षानंतर संपूर्ण भारतीय बनावटीचे हे यान अशा भागात उतरणार आहे, ज्या भागात आतापर्यंत कोणत्याही देशाने यान उतरवले नसेल. त्यामुळे ही मोहीम जगाच्या पाठीवर भारताचे नाव उंचवणारी असेल.

आता पर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीन या देशाची याने चंद्रावर यशस्वीरीत्या उतरली होती. त्यात भारत हा आता चौथा देश ठरणार आहे. हे यान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्रावर उतरेल. त्यानंतर ते साधारणतः वर्षभर चंद्रावर असेल, या काळात चंद्रावर असलेली खनिज संपत्ती आणि पाण्याचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. अशी माहिती खगोल अभ्यासक आणि एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

Last Updated : Jul 15, 2019, 12:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details