औरंगाबाद - जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भाजीपाला घेण्यासाठी अनावश्यक वर्दळ वाढली आहे. याठिकाणची गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या, तसेच बाजार समितीच्या आवारात सकाळी सात ते नऊ या कालावधीत पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशा मागणीचे पत्र बाजार समितीने सिडको पोलिसांना मंगळवारी दिले आहे.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये नागरिकांची गर्दी, बंदोबस्तासाठी पोलिसांना पत्र - corona india
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी मुभा दिली आहे. मात्र, संचारबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवेल, या भीतीने नागरिक बाजार समिती परिसरात गर्दी करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी मुभा दिली आहे. मात्र, संचारबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवेल, या भीतीने नागरिक बाजार समिती परिसरात गर्दी करत आहेत. त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यायची नामुष्की ओढवणार असल्याचे बाजार समितीच्या अध्यक्ष राधाकिसन पठाडे यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था, जनजागृती यासह बाजार समितीने विविध उपाययोजना केल्या आहेत. बाजारात शेतमालाची दररोज आवक होते. शेतकरी माल विक्रीसाठी आणतात. बाजार समितीच्या आवारातच व्यापारी खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. असे असतानाच समिती परिसरात अनावश्यक गर्दी वाढली आहे. गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजनेसाठी बाजार समितीच्या आवारात सकाळी सात ते नऊपर्यंत पोलीस बंदोबस्त देऊन अनावश्यक गर्दीला आळा घालावा, असे पत्र बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांनी पोलिसांना दिले आहे.