औरंगाबाद - आपण जिथे जाऊ तेथे आपल्या शरीरातून दुर्गंध येवू नये अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. त्यासाठी अनेक जण कपड्यांवर चांगला डियो स्प्रे किंवा परफ्यूम लावतात. मात्र आजच्या आधुनिक युगात आता पारंपरिक अत्तराची मागणी वाढली असल्याचं व्यावसायिक सांगत आहेत. डियो स्प्रे आणि परफ्यूम यांमध्ये केमिकल युक्त रसायन असल्याने त्याने अपाय होण्याची शक्यता आहे. त्या ऐवजी अत्तर वापरणे योग्य असल्याचं वापरकर्ते सांगत आहेत. (attar selling more than deo and perfumes). दुआ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित एक्स्पो (Expo organized by Dua Foundation) मधे जवळपास दीडशे प्रकारचे अत्तर विक्रीसाठी आल्याने अत्तर प्रेमींना वेगळी मेजवानी मिळाली आहे.
दुबईच्या अत्तराला चांगली मागणी -औरंगाबादच्या आमखास मैदान येथे दोन दिवसांपासून फूड फेस्टिवल सुरू करण्यात आला आहे. (food festival at aamkhas maidan). यामधे सर्वांचे लक्ष आकर्षित करत आहे ते दुबईचे अत्तर. (Attar from Dubai). मुस्क रिजाल असं या अत्तराचं नाव असून त्याला चांगली मागणी आहे. सहाशे रुपये तोळा अशी या अत्तराची किंमत आहे. महाग जरी असला तरी त्याचा सुगंध सर्वांना आकर्षित करत आहे. हे अत्तर दुबईहून मुंबईला आणि नंतर इतरत्र विक्रीसाठी येत असल्याची माहिती व्यावसायिक मोहम्मद इम्रान यांनी दिली.