वैजापूर(औरंगाबाद)- औरंगाबादचा वैजापूर तालुका म्हटलं की वाळू तस्करी करणाऱ्याचे महेर घर म्हणून जिल्ह्यात चर्चेले जाते. अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न तालुक्यात ऐरणीवर असतानाच तालुक्यातील बाभूळगावगंगा येथील गोदापात्रात फिल्मीस्टाईल मोठी धुमश्चक्री झाली. जवळपास 30 जणांनी वाळू ठेकेदाराच्या मजुरांवर दगडफेक करण्यासह लाठ्याकाठ्यांनी कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. दगडफेकीमुळे मजूराणी जीव वाचवण्यासाठी पळत होते. या घटनेत काही मजूर जखमीही झाले आहे. दरम्यान घटनेस 24 तास उलटून गेल्यानंतर अखेर औरंगाबादच्या विरंगाव ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
वाळू ठेकेदाराच्या कार्यलयावर हल्ला, गोदापात्रत झाला हा थरारक प्रकार - attack on sand contractors office in vaijapur at aurangabad
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील तालुक्यातील बाभूळगावगंगा येथील गोदावरी नदी पात्राच्या वाळूपट्ट੍याचा महसूल प्रशासनाने लिलाव करून हा वाळूचा ठेका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक नागरिक व ठेकेदार यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास तालुक्यातील बाभूळगावगंगा येथील गोदापात्रात हे वाळूयुध्द अचानक पेटले अन् जवळपास तीस जणांच्या टोळक्याने वाळू भरणाऱ्या मजुरांवर अंदाधुंद दगडफेक सुरू केल्याने मजूर धस्तावले व वाट मिळेल तिकडे पळू लागले.
स्थानिक नागरिक व ठेकेदार यांच्यामध्ये शीतयुद्ध -औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील तालुक्यातील बाभूळगावगंगा येथील गोदावरी नदी पात्राच्या वाळूपट्ट੍याचा महसूल प्रशासनाने लिलाव करून हा वाळूचा ठेका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक नागरिक व ठेकेदार यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास तालुक्यातील बाभूळगावगंगा येथील गोदापात्रात हे वाळूयुध्द अचानक पेटले अन् जवळपास तीस जणांच्या टोळक्याने वाळू भरणाऱ्या मजुरांवर अंदाधुंद दगडफेक सुरू केल्याने मजूर धस्तावले व वाट मिळेल तिकडे पळू लागले. एवढेच नव्हे या टोळक्याने ठेकेदाराच्या कार्यालयावरही दगडासह लाठ्याकाठ्यांनी हल्ला करून तोडफोड केली. यात कार्यालयासह सीसीटीव्ही कॅमेर्यांचे नुकसान झाले. मजूरही या घटनेत जखमी झाले आहेत.
प्रशासनाने वाळूपट्टयाचा लिलाव केल्यापासून हे टोळीयुध्द - घटनेनंतर वीरगाव ठाणेप्रमुखांसह कर्मचाऱ्यांचा सह गोदापात्रात दाखल झाले होते. परंतु पोलिसांचा ताफा नेहमीप्रमाणे उशिरा पोहचल्यामुळे हल्लेखोर पसार झाले होते. दरम्यान प्रशासनाने वाळूपट्टयाचा लिलाव केल्यापासून हे टोळीयुध्द सुरू आहे. हप्तेखोरीच्या लालसेपोटी हा प्रकार सुरू आहे. या हप्तेखोरीच्या माध्यमातून सर्वच यंत्रणेचे हात बरबटलेले आहेत. त्यामुळे ठेकेदारास अडचणीत आणण्यासाठी सर्वच यंत्रणा एकवटली असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. बाभूळगावगंगा येथील घटनेच्या संबंधी विरंगाव ठाण्याचे स.पो.नि. विजय नरवडे यांच्याशी संपर्क साधला असता नेहमी प्रमाणे त्यांचा फोन बंद होता.