औरंगाबाद- कन्नडचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटना रात्री एकच्या सुमारास घडली. या दगडफेकीत घराच्या खिडकीच्या काचा आणि कारच्या काचा अज्ञातांनी फोडल्या आहेत. ही दगडफेक शिवसेनेने केल्याचा संशय हर्षवर्धन जाधव यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
हर्षवर्धन जाधवांच्या घरावर हल्ला हेही वाचा - विधानसभा २०१९ : आज पुणे साताऱ्यासह परळीत पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा
शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड येथे झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे शिवसैनिक संतप्त झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ही तोडफोड झाल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - पवार-फडणवीस आज नाशिकमध्ये आमने-सामने
रात्री एकच्या सुमारास चार जण दोन दुचाकींवरून आले आणि त्यांनी गेटच्या बाहेरून हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीत घराच्या खिडकीच्या आणि कारच्या काचा फुटल्या आहेत. हर्षवर्धन जाधव कन्नड येथून स्वतःच्या शिवस्वराज्य बहुजन पक्षाच्यावतीने अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. हल्ला करणाऱ्यांनी देखील समोर येऊन हल्ला करायला पाहिजे होता. या बाबत पोलीस तक्रार करणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी सांगितलं.