कन्नड(औरंगाबाद)- गौताळा अभ्यारण्याच्या वन्यजीव रक्षकाच्या निवासस्थानावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. हिवरखेड़ा गौताळा येथील निवासस्थानावर अज्ञाताने पहाटे तीन वाजता दगडफेक करुन गस्तीवाहनाला आग लावली.
कन्नडमध्ये वन्यजीव रक्षकाच्या निवासस्थानावर दगडफेक, वाहन जाळले - gautala abhayaranya
गौताळा अभ्यारण्याच्या वन्यजीव रक्षकाच्या निवासस्थानावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. हिवरखेड़ा गौताळा येथील निवासस्थानावर अज्ञाताने पहाटे तीन वाजता दगडफेक करुन गस्तीवाहनाला आग लावली.
नेमके काय घडले ?
अभ्यारण्याचा हिवरखेड़ा गौताळा येथील निवासस्थानात कन्नड विभागाचे वन्यजीवरक्षक राहुल शेळके आणि नागद वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले हे राहतात. सोमवारी पहाटे त्याच्या निवास्थानावर अचानक दगडफेक सुरु झाल्याने दोन्ही अधिकारी धास्तावले. त्यांनी शहर पोलीस ठाणे, तहसिलदार यांना फोनवरुन माहिती दिली. दगडफेकीमुळे दोन्ही अधिकारी बाहेर आले नाहीत. या दरम्यान निवासस्थानावर बाहेर उभ्या असलेल्या गस्ती वाहनाला आग लावून आरोपी फरार झाले. वन्यजीव रक्षक राहुल शेळके यांनी याबाबत कन्नड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.