छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): यंदाचा रक्षाबंधन सोहळा काहीसा वेगळा मानला जात आहे. कारण या दिवशी मात्र राखी बांधण्यासाठी काही बंधन असल्याची माहिती ज्योतिषाचार्य अनंत पांडव यांनी दिली. रक्षाबंधन साजरा करण्यासाठी 30 ऑगस्टला सायंकाळी 05:30 ते 6:30 आणि रात्री 09:02 मिनिटानंतर योग्य वेळ असल्याची माहिती अनंत पांडव यांनी दिली आहे. (Rakshabandhan 2023 Muhurat) (Raksha Bandhan 2023 Muhurat) (Rakhi Muhurat 2023)(Raksha Bandhan 2023)
रक्षाबंधनसाठी वेळ : 30 ऑगस्ट 2023 रोजी श्रावण शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा असल्याकारणानं रक्षाबंधनाला विशिष्ट वेळ शास्त्रानं निर्देशित केली. शुक्ल पक्षातील चतुर्थी अष्टमी एकादशी किंवा पौर्णिमा या काळामध्ये भद्रा असल्यास किंवा कृष्ण पक्षातील तृतीया दशमी, सप्तमी आणि चतुर्दशीला भद्रा असल्यास हा काळ गृहप्रवेश, विवाह, रक्षाबंधन करण्यासाठी शास्त्राने निषिद्ध मानला आहे.
या काळामध्ये रक्षाबंधन करू नये : भद्राचा वास तीन ठिकाणी असतो. मृत्यू लोक आणि पाताल लोक विशिष्ट राशीमध्ये भद्रा निवास करत असल्यास, त्या त्या लोकांमध्ये भद्रेचा वास असतो असे समजले जाते. 30 ऑगस्ट रोजी कुंभ राशीमध्ये भद्रेचा वास असल्याकारणाने पृथ्वीवरती भद्रा वास असणार आहे. 30 ऑगस्ट 2023 ला 10 वाजून 59 मिनिटानंतर पौर्णिमा आरंभ होते. पण त्याच दिवशी सकाळी दहा वाजून 59 मिनिट ते नऊ वाजून दोन मिनिटापर्यंत भद्रा असल्याकारणाने, या काळामध्ये रक्षाबंधन करू नये असे शास्त्रामध्ये उल्लेख आहे.