औरंगाबाद - भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या बोलण्याला अर्थ नाही. महाविकास आघाडीचे काम उत्तम चालले आहे. मुनगंटीवार यांना 'मुंगेरीलाल के हसीन सपने' पाहण्याची सवय आहे. ते पाहू द्या. अशी टोला सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष अजूनही शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास तयार आहे, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्यावर तसे काही होणार नाही. आमचे मस्त चालले आहे, असा विश्वास काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच मुनगंटीवार 'मुंगेरीलाल के हसीन सपने' पाहत आहेत, ते त्यांना पाहू द्या, असा टोलाही मंत्री चव्हाण यांनी लगावला.