महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 12, 2021, 4:48 PM IST

ETV Bharat / state

'या' मागणीसाठी धामोरीचे उपसरपंच करताहेत पावसात उपोषण

गंगापूरच्या तहसीलदारांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने 65 मिलीमिटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पंचनाम्यामध्ये डोनगाव मंडळाचा समावेश नसल्याने भरपावसात उपसरपंच उपोषणाला बसले आहेत.

v
v

गंगापूर (औरंगाबाद) -गंगापूरच्या तहसीलदारांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने 65 मिलीमिटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यात डोनगाव मंडळातील गावांचा समावेश नसल्याचे आरोप करत धामोरीचे उपसरपंच रवी चव्हाण पर्जन्यमापक यंत्राजवळ उपोषणाला बसले आहेत.

बोलताना उपसरपंच

पंचनामाम्यात गावे समाविष्ट होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार

अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे पर्जन्यमापक यंत्र हे डोनगाव येथील ग्रामपंचायत परिसरात उघड्यावर बसवण्यात आले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कार्यवाही होत नाही, तसेच डोनगाव मंडळातील गावे समाविष्ट होत नाही तोपर्यंत शेतकाऱ्यांसमवेत उपोषण सुरुच ठेवणार, अशी भूमिका धामोरीचे उपसरपंच रवी चव्हाण यांनी घेतली आहे. याठिकाणी भाजपयुमोचे जिल्हाउपाध्यक्ष अमोल जाधव, वाल्मिक वाकळे, राम तुपे, दत्तू कर्हाळे यांसह अनेक शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते.

हे ही वाचा -औरंगाबादच्या ग्रामीण भागात पाचवी ते सातवी वर्गांचा होणार श्री गणेशा

ABOUT THE AUTHOR

...view details