औरंगाबाद- जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यास आणि एका लिपिकास चलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. मीना अशोक अंबाडेकर असे त्या लाचखोर महिला अधिकारीचे नाव असून वली मोहम्मद हनीफ शेख इब्राहिम असे त्या लिपिकाचे नाव आहे. या प्रकरणी क्रांती चोक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच स्वीकारताना औरंगाबाद जिल्हा परिषदेतील महिला अधिकारीस अटक - Aurangabad District Social Welfare department
औरंगाबाद जिल्हा परिषद कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय कर्मचाऱ्याकडून अर्जित रजा मंजूर करण्यासाठी १४ मे रोजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मीना अंबाडेकर यांनी ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
लाचखोर महिला अधिकारी आणि लिपिक
औरंगाबाद जिल्हा परिषद कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय कर्मचाऱ्याकडून अर्जित रजा मंजूर करण्यासाठी १४ मे रोजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मीना अंबाडेकर यांनी ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. या प्रकारची माहिती मिळताच लाच लचूपत प्रतिबंधक विभागच्या पथकाने कार्यालय परिसरात सापळा रचला आणि मीना तसेच मोहम्मद यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडले. या दोघांविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : May 17, 2019, 5:50 AM IST