महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Army Jawan Missing : सैन्यात कर्तव्य बजावणारा मुलगा 2010 पासून बेपत्ता; आई-वडिलांचे उपोषण - रवींद्र पाटील

छत्रपती संभाजीनगर येथील सैन्यात कर्तव्य बजावणारा मुलगा 2010 पासून तो बेपत्ता आहे. मुलाचा शोध घेण्यासाठी आई-वडील वनवन फिरत आहेत. शोध घेताना दोन एकर शेती विकावी लागली. मात्र अद्यापही मुलाचा शोध लागला नाही. यामुळे आता वृध्द आई वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

Hunger Strike
आई वडिलांचे उपोषण

By

Published : May 25, 2023, 5:36 PM IST

Updated : May 25, 2023, 6:24 PM IST

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आई वडिलांचे उपोषण

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तालुक्यातील माळेगाव पिंपरी येथील रवींद्र भागवत पाटील हा तरुण 2010 पासून बेपत्ता आहे. तो सैन्यात कर्तव्यावर गेला असताना परत आला नाही. त्यांचा संपर्क देखील झाला नसल्याने कश्मिर गाठत मुलाचा शोध घेतला, मात्र त्याचा फायदा झाला नाही. तर आता बेपत्ता मुलगा शोधून द्या या मागणीसाठी वृध्द आई वडिलांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. न्याय द्या या मागणीसाठी भर उन्हात उपोषणाला बसण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

रवींद्र भागवत पाटील हा तरुण 2010 पासून बेपत्ता आहे. सैन्यात कर्तव्यावर गेला असताना परत आला नाही बेपत्ता मुलगा शोधून द्या - रवींद्रची आई



2010 पासून आहे रवींद्र गायब: सोयगाव तालुक्यातील माळेगाव पिंपरी येथील रवींद्र भागवत पाटील हा तरुण सन 2005 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाला होता. जम्मू कश्मीर सीमा रेषेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी नियुक्त झाली. मात्र 2010 पासून तो आई-वडिलांच्या संपर्कात राहिला नाही. काही दिवस गेले कर्तव्य महत्वाचे असे म्हणत आई-वडिलांनी काही काळ वाट पाहिली. वडिलांची पैसे उसने घेऊन कश्मिर गाठले मात्र तिथे मुलगा कुठे आहे हे कळले नाही. उलट त्यांना तेथून काढून देण्यात आल्याचा आरोप वडील भागवत पाटील यांनी केला आहे. याबाबत भारतीय सैन्य कार्यालयासोबत 2012 पासून सतत आपल्या मुलाबाबत विचारणा केली. मात्र त्यांना गेल्या 11 वर्षा पासून कार्यालयामार्फत योग्य ती माहिती मिळत नाही. आपल्या मुलाचा शोध लागत नसल्यामुळे अखेर त्यांना न्याय मिळावा म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास आई वडिलांनी सुरू केले आहे.

मुलांला शोधण्यासाठी दोन एकर जामीन विकली. वडिलांची पैसे उसने घेऊन दोनदा कश्मिर येथे जाऊन मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र तिथे मुलगा कुठे आहे हे कळले नाही - वडील भागवत पाटील


जमीन विकून घेतला शोध: सैन्यात जवान असलेल्या रवींद्र पाटील या जवानाचा शोध घेण्यासाठी वडिलांनी शोध घ्यायला सुरुवात केली. मुलाचा संपर्क नाही आणि खिशात पैसे नसल्याने त्यांनी आपली दोन एकर जामीन विकली. त्यात दोनदा कश्मिर येथे जाऊन मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मुलगा देखील मिळत नाही तिची माहिती कळलेली नाही. घरी मोठा मुलगा आहे, मात्र त्याचा आधार मिळत नाही. सून मुलाच्या नादात उरलेली जमीन विकता का? आमच्यासाठी काही तरी राहू द्या असे टोमणे मारते, त्यामुळे आता कोणाचा आधार नाही आमचा मुलगा शोधून द्या अशी मागणी व्यथित आई वडिलांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. Aurangabad News लिफ्टमध्ये खेळताना डोके अडकून तेरा वर्षीय मुलाचा करुण अंत
  2. Two Boys Died तलावात पडून दोन बालकांचा मृत्यू एकाला वाचवण्याच्या नादात दुसराही पाण्यात बुडाला
  3. Aurangabad Road Accident today समृद्धी महामार्गावर भीषण अपघात तेलंगाणातील एकाच कुटुंबातील चार भावंडांचा औरंगाबादेत मृत्यू
Last Updated : May 25, 2023, 6:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details