महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Prashant Bamb And BRS: आमदार प्रशांत बंब आणि बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; व्हिडिओ व्हायरल - ड्रेनेजच्या कामावरून या दोन्ही गटात वाद

गंगापूर तालुक्यात भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते आणि बीआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. लासुर येथे या दोन्ही गटात गावातील विकास कामाच्या कारणावरून हा राडा झाला असल्याचे बोलले जात आहे.

BRS Workers In Gangapur
कार्यकर्त्यांमध्ये राडा

By

Published : Jul 11, 2023, 6:51 PM IST

औरंगाबाद ( गंगापूर ) :गंगापूर तालुक्यात लासुर गावात भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते आणि बीआरएसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील लासुर गावात होत असलेल्या ड्रेनेजच्या कामावरून या दोन्ही गटात वाद झाला आहे. यावेळी बीआरएस पक्षाचे नेते संतोष माने आणि प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते थेट आमने-सामने आले. एवढेच नाही तर दोन्ही गट थेट एकेमकांच्या अंगावर धावून आले होते. या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

दोघांमध्ये झाली चकमक : प्रशांत बंब यांच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघातील लासुर स्टेशन येथे ड्रेनेज लाईनचे विकास कामे सुरु आहे. दरम्यान या कामात घोटाळा होत असून चुकीच्या पद्धतीने काम करण्यात येत असल्याचा आक्षेप, बीआरएस पक्षाचे नेते संतोष माने यांनी घेतला होता. त्यामुळे त्यांनी थेट कामाच्या ठिकाणी जाऊन काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप केला. तसेच संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे यावेळी उपस्थित असलेले प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे दोघांमध्ये सुरुवातील शाब्दिक चकमक आणि त्यानंतर थेट पकडापकडी सुरू झाली. मात्र यावेळी उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाला शांत केले. त्यामुळे सध्या गावात शांतता आहे.

दोन गटात राडा : याआधीही अशीच एक घटना घडली होती. लग्नाच्या हळदी समारंभात डीजेच्या तालावर नाचताना धक्का लागल्याने, दोन गटात धारदार शस्त्र, लोखंडी रॉड, फरशीने एकावर हल्ला झाला होता. ही घटना भिवंडी शहरातील अंजूर फाटा येथील साठे नगरमधील एका लग्न मंडपात घडली होती. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -

  1. Gangapur Sugar Factory Elections : भाजपच्या बालेकिल्यात सेनेचा सुरुंग; आमदार प्रशांत बंब चितपट, उद्धव सेनेचा विजय
  2. BRS office In Nagpur : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज नागपुरात; भारत राष्ट्र समितीच्या कार्यालयाचे होणार उद्घाटन

ABOUT THE AUTHOR

...view details