औरंगाबाद- शहर पोलीस दलातील पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रतिक्षेत असलेले सातव्या वेतन आयोगाची वाढीव रक्कम आणि एरिएस एप्रिल महिन्याच्या पगारात समाविष्ट करण्यात येणार आहे. सोमवारनंतर हे वेतन १५०० पोलिसांच्या खात्यात जमा होणार आहे. तर उर्वरित सुमारे २ हजार पोलिसांच्या वेतननिश्चितीची प्रक्रिया सुरू असून पुढील महिन्याच्या वेतनात त्यांना लाभ मिळणार आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार एप्रिलचा पगार मिळणार; १५०० पोलिसांना लाभ
मागील अनेक महिन्यांपासून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सातव्या वेतन आयोगाच्या वाढीव रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. रकमेच्या फरकाची प्रक्रिया किचकट असल्याने आणि लोकसभा निवडणुकीमुळे मनुष्यबळ कमतरता भासल्याने या प्रक्रियेला थोडा विलंब झाला आहे.
मागील अनेक महिन्यांपासून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सातव्या वेतन आयोगाच्या वाढीव रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. रकमेच्या फरकाची प्रक्रिया किचकट असल्याने आणि लोकसभा निवडणुकीमुळे मनुष्यबळ कमतरता भासल्याने या प्रक्रियेला थोडा विलंब झाला आहे. मात्र, तरीही पोलीस आयुक्तांनी वेतन निश्चितीबाबत गांभीर्याने विचार करीत लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. यामुळे आतापर्यंत १५०० पोलीस कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती आणि इतर कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.
या १५०० पोलीस कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार एप्रिल महिन्याच्या पगारात समाविष्ट करण्यात आले आहे. सोमवारनंतर या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. तर उर्वरित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सेवापुस्तिका तपासणी आणि वेतननिश्चितीचे काम सुरू आहे. त्यांना पुढील महिन्याच्या पगारात वाढीव वेतन देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.