औरंगाबाद -सिल्लोड तालुक्यातील अन्वी सजाचे तलाठी राहुल अशोक पांडे यांचा मृतदेह सपकाळ वाडी परिसरातील एका विहिरीमध्ये आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
विहिरीत सापडला अन्वीच्या तलाठ्याचा मृतदेह; आत्महत्या केल्याचा संशय - Anvi village talathi Death
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सपकाळ वाडी येथील वाल्मिक ऋषी मंदिर जवळच्या विहिरीमध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. विहिरीजवळ तलाठी राहुल पांडे यांची मोटारसायकल उभी असल्याने सदर मृतदेह हा तलाठी राहुल पांडे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सपकाळ वाडी येथील वाल्मिक ऋषी मंदिर जवळच्या विहिरीमध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. विहिरीजवळ तलाठी राहुल पांडे यांची मोटारसायकल उभी असल्याने सदर मृतदेह हा तलाठी राहुल पांडे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पांडे यांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला असून सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
राहुल पांडे यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळतात पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी व नागरिकांनी घटनास्थळी भेट दिली होती.