महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामीण भागात आढळला कोरोनाचा रुग्ण; दौलताबाद येथील महिलेला लागण

औरंगाबादेत कोरोनाची रुग्णसंख्या 53 वर गेली आहे. त्यापैकी 22 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर, पाच रुग्णांचे निधन झाले आहे. 26 रुग्णांवर जिल्हा रुग्णालय आणि घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

another one covid 19 patient found in aurangabad
ग्रामीण भागात आढळला कोरोनाचा रुग्ण; दौलताबाद येथील महिलेला लागण

By

Published : Apr 26, 2020, 10:17 PM IST

औरंगाबाद - कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसंदिवस वाढ होत चालली आहे. रविवारी सकाळी दोन महिला रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर सायंकाळी पुन्हा दोन महिलांना संसर्ग झाल्याच निष्पन्न झाले. यात पहिल्यांदाच ग्रामीण भागात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आसेफिया कॉलनीत राहणाऱ्या 39 वर्षीय महिलेला तर दौलताबाद येथील 53 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल सायंकाळी प्राप्त झाले. दिवसभरात 4 रुग्ण निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता 53 वर गेली आहे.

आसेफिया कॉलनी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. सकाळपासून या परिसरात दोन महिलांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात दौलताबाद सारख्या ग्रामीण भागात महिलेला कोरोनाची लागण झाल्याच निष्पन्न झाल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 48 तासात 13 रुग्ण आढळून आल्याने रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं समोर आले आहे. टाऊन हॉल, किलेअर्क या नवीन भागांसह दौलताबाद येथे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात नवे हॉटस्पॉट होण्याची भीती निर्माण झाली आहे. औरंगाबादेत कोरोनाची रुग्णसंख्या 53 वर गेली आहे. त्यापैकी 22 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर पाच रुग्णांचे निधन झाले आहे. 26 रुग्णांवर जिल्हा रुग्णालय आणि घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details