औरंगाबाद- एका घरात खिडकीची जाळी तोडून चोरी केल्याची घटना न्यू शांतिनिकेतन कॉलनीत घडली आहे. चोरट्यांनी सुमारे पाउण लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत संदीप छगन दाभाडे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप दाभाडे हे घरात एकटे झोपले होते. त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्यामुळे बाकी कुटुंब हे त्यांच्या मेहुण्याच्या घरी होते. हीच संधी साधत रात्री उशिरा अज्ञात चोरांनी खिडकीची जाळी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर हॉलमध्ये असलेल्या दोन्ही कपाटातील साहित्य अस्तव्यस्त करत, दोन तोळ्यांचा सोन्याचा हार, मंगळसूत्र तसेच 20 हजारांची रोकड, असा 74 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संदीप यांना जाग आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी ताबडतोब मेहुण्याला बोलवत जवाहरनगर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
औरंगाबादेत खिडकीची जाळी तोडत चोरी, गुन्हा दाखल - औरंगाबाद गुन्हे बातमी
अज्ञात चोरट्यांनी खिडकीची जाळी तोडत घरात प्रवेश करुन सुमारे पाउण लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
घटनास्थळ