वैजापूर (औरंगाबाद) : वैजापूरच्या शासकीय निवासी वसतिगृहातील कोरोना उपचार केंद्रात ५ मे रोजी रात्री खासगी रुग्णवाहिकाचालकाने ग्रामीण भागातील कोरोनाबाधित महिलेची छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणी रुद्र मावळे (रा. डाकपिंपळगाव, ता. वैजापूर) याच्याविरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला.
वैजापूरच्या शासकीय कोविड सेंटरमध्ये महिलेला छेडले, एकाविरोधात गुन्हा दाखल - औरंगाबाद न्यूज
वैद्यकीय अधिकारी सिद्धार्थ इंगोले यांनी तक्रार दिल्यानंतर रुग्णवाहिका चालकाविरोधात विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वैजापूरच्या शासकीय कोविड सेंटर मध्ये महिलेला छेडले, एकाविरोधात गुन्हा दाखल
वैजापूर पोलिसांनी नोंदविला गुन्हा
वैद्यकीय अधिकारी सिद्धार्थ इंगोले यांनी तक्रार दिल्यानंतर रुग्णवाहिका चालकाविरोधात विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संतपजनक घटनेने तालुक्यातील कोविड सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या व्यक्तीने कोविड सेंटरमध्ये जाऊन महिला रुग्णाशी गैरवर्तन केले, तसेच सदरील महिलेच्या पतीला धमकावल्याचाही आरोप पीडितांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.