विरोधी पक्षनेते अंबादास दानवे औरंगाबाद - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा ( BJP President J. P. Nadda ) यांची औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. या माध्यमातून भाजप लोकसभेचा रणसिंग फुंकेल असे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले होते. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve Criticize To Bjp ) यांनी टीका केली आहे. जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाची जादू आजही कायम आहे आणि ती पुढेही उद्धव ठाकरे ( Ambadas Danve Statement On Shiv Sena ) यांच्या नेतृत्वात कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर डॉ भागवत कराड लोकसभेचे उमेदवार ( Shiv Sena Will Win Under Uddhav Thackeray Leadership ) असतील असे बोलले जाते. त्यावर कोणीही येऊ द्या विजय आमचाच अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
अजित पवार यांची भावना वेगळी असावीराष्ट्रवादी नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत राज्यभर पडसाद उमटत आहेत. त्यांची भावना वेगळ्या असावी असे मत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve On Uddhav Thackeray ) यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक होते. त्यामुळे ते धर्मवीरच आहेत आणि राहतील. मात्र, अजित पवार हे नेहमी त्यांना युगपुरुष असे म्हणतात. युगपुरुष हा धर्मविर पेक्षा मोठे असावे असे त्यांचे म्हणणे असेल. तरी ते युगपुरुष तर आहेतच त्याचबरोबर धर्मवीर देखील आहेत, असे स्पष्टीकरण विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.
अधिवेशनाचा कालावधी कमीअधिवेशनाचा कालावधी कमी आहे. प्रश्न मांडण्यासाठी अवधी जास्त हवा. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठे व्यासपीठ आहे. जेवढे शक्य होईल तितके प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. वेळ कमी आहे त्यामुळे पूर्णपणे समाधानी नाही. गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. जमिनीबाबत न्यायालयाने ताशेरे ओढल्याने मुख्यमंत्र्यांनी ( Shiv Sena Will Win Under Uddhav Thackeray Leadership ) माहिती नव्हती असे म्हणत त्यावर आम्ही कागदपत्र सादर केले. न्यायालय निश्चित आगामी काळात योग्य निर्णय करेल. अब्दुल सत्तारांबाबत फक्त वाशिम येथील प्रकरण समोर आले. मात्र इतर ठिकाणी देखील अनेक मुद्दे आहेत. वाळू लिलाव असेल किंवा एका अधिकाऱ्याला धमकावत न्यायालयाच्या विरोधात काम केले जात आहे. त्याचे पुरावे नंतर सादर करेल असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
इम्तियाज जलील यांचे आरोप खोटेइम्तियाज जलील यांचे आरोप खोटे आहेत. काही ठिकाणी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, नारायण राणे आणि राजेंद्र दर्डा ( Ambadas Danve Criticize To Bjp ) मंत्री असताना त्यांची प्रक्रिया सुरू झाली होती. व्यावसायिक दृष्टिकोनातून बदल केले जातात. त्यामुळे त्यांचे आरोप खोटे आहेत. भाजप आपण वेगळे स्वच्छ पक्ष समजते. तर तुमच्या मंत्र्यांवर होणारे आरोप कसे सहन केले जातात. त्यांची चौकशी का होत नाही. टी ई टी घोटाळ्यात वेतन पत्र सादर केले तरी त्यात चौकशी का नाही? मंत्र्यांना का सहन करतात, असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थितीत केला.
विरोधी पक्षाने आपली भूमिका मांडलीविरोधी पक्ष थंड पडला नाही. विदर्भाच्या प्रश्नावर अधिवेशन होते. उद्योग आणि इतर प्रश्नावर हे अधिवेशन होते. संत्रा आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली. उद्योगांना येणारे प्रश्न मांडले. त्यावर चर्चा गरजेची होती. त्याबाबत प्रश्न मांडले. ती जबाबदारी पार पाडली. सरकारने विरोधकांचे ( Ambadas Danve Statement On Shiv Sena ) अनेक प्रश्नांची दखल घेतली. त्यांनी काही मान्य केले. आम्ही विरोधक आहोत शत्रू नाही. शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही आंदोलन केले. सभागृहा बाहेर आणि आत आम्ही आमच्या भूमिका मांडल्या. अडकलेले मंत्री सुटणार नाहीत. जनतेच्या न्यायालयात कोणीही सुटणार नाही. सुप्रीम कोर्टात सरकार विरोधात निकाल लागेल, असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.