महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ambadas Danve On Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीसाठी शेकडो कोटी रुपयांचा चुराडा - अंबादास दानवेंची टीका - अंबादास दानवे

Ambadas Danve On Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीवरून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांची राज्य सरकारवर टीका केलीय. या बैठकीसाठी सरकारनं शेकडो कोटी रुपये खर्च केलेत. मराठवाड्यासाठी फक्त बोलघेवड्या घोषणा, थापा देऊन गेलेत, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलीय.

Ambadas Danve On Cabinet Meeting
अंबादास दानवे

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 10:44 PM IST

अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद

छत्रपती संभाजीनगरAmbadas Danve On Cabinet Meeting: छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून दोन दिवसीय राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. या दरम्यान विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीका केलीय. अवघ्या 50 ते 60 मिनिटाच्या बैठकीसाठी शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. पुन्हा बोलघेवड्या घोषणा, थापा हे मंत्रीमंडळ मराठवाड्यासाठी देऊन गेले आहेत, असं ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या :2016 साली झालेले निर्णय व आजच्या निर्णयात काहीही फरक नाही. मराठवाड्याच्या जनतेच्या आशा, अपेक्षा, आकांक्षांचा खून हे सरकार करत आहे. हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात 1300 वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर, 785 वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात घडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात मंत्रिमंडळात एक शब्दही या सरकारनं काढला नाही. अंतरवाली सराटी येथेमराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? पोलिसांना लाठीचार्जचा आदेश देणाऱ्यावर कारवाईची भूमिका सरकारनं का घेतली नाही, या सरकारनं फक्त घोषणांचा पाऊस पाडलाय. जुन्या घोषणेचा विसर या सरकारला पडलाय. जुन्याच घोषणा या सरकारनं नव्याने केल्या आहेत, असं अंबादास दानवे माध्यमांशी बोलताना म्हणाले. (Cabinet meeting in Chhatrapati Sambhajinagar)


राज्य सरकारवर टीका :मुख्यमंत्र्यांनी पार गोदावरी योजना काय, हे सांगून दाखवावं. दुष्काळी परिस्थिती असतानाही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरकारनं कोणताही आधार दिला नाही. सरकारनं मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसली आहेत. पर्यटनाची राजधानी म्हणून संभाजीनगरकडे या सरकारनं दुर्लक्ष केलंय. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने संभाजीनगर व धाराशिव नाव करण्याचा ठराव महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये घेतलाय. त्या निर्णयात या सरकारचं कर्तृत्व काय? हे सरकार घटनाबाह्य आहे. सरकारनं जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये, शेतकऱ्यांच्या खात्यांना होल्ड लावणारा कायदा शेतकऱ्यांना दुखावणारा आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर केलीय. (Chhatrapati Sambhajinagar news)

हेही वाचा :

  1. Maharashtra Cabinet Decisions Today: सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकार करणार मदत, जाणून घ्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय
  2. Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गिरीश महाजन यांचे मोठे विधान, म्हणाले, अमित शाहांचा दौरा...
  3. Maharashtra Cabinet Expansion News: मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा, शिंदे गटाचे चार आमदार होणार नवे मंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details