छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र नवीन वर्षाचे मोठा उत्साहात केले जात आहे. गुलमंडी भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाकरे गटाकडून सकाळी गुढी उभारून नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते यांनी येणाऱ्या वर्षात गद्दार मुक्त सरकार येऊ दे, अशी मनोकामना व्यक्त केली. तर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागू दे, अशी इच्छा व्यक्त करत सरकारवर टीका केली.
निष्ठावंतांचे सरकार येऊ दे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ठाकरे गटाकडून जुन्या शहरात गुढी उभारत नवीन वर्षाची सुरुवात नागरिकांच्या साक्षीने करण्यात आली. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली. नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने व्यक्त करत असून नागरिकांना चांगले सरकार मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तितकच नाही तर, राज्यातील इडा पिडा निघून जावो आणि बळीच राज्य येवो. हे सरकार व्यक्तिगत विकासामध्ये गुंतलेले आहे. यांना जनतेशी काही पडलेले नाही, हे वर्ष गद्दारी पासून मुक्त होऊन राज्यात निष्ठावंतांचे सरकार यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्ती केली.
संपूर्ण शिधा गद्दारांना : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुढे म्हणाले की, अद्याप गरिबांसाठी जाहीर झालेली शिधा नागरिकांपर्यंत पोहचली नाही. हा सरकारच्या शिधा जनतेपर्यंत न पोहोचणे म्हणजे हा संपूर्ण शिधा 40 गद्दारांना जातो, त्यामुळे जनतेला मिळत नाही.