महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाळूज दुर्घटना प्रकरणी कंपनी मालकावर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, लोकप्रतिनिधींची मागणी - अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar Factory Fire : वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेल्या दुर्घटनेनंतर पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. बाहेर राज्यातील असेल तरी ते कामगार होते. त्यामुळं त्याबाबत गंभीर दखल घेतली जाईल असं देखील त्यांनी सांगितलं. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी कंपनी मालक आणि एमआयडीसी अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. इतकंच नाही तर अधिकाऱ्यांना घटास्थळावर धारेवर धरत आपला रोष व्यक्त केलाय.

Ambadas Danve
अंबादास दानवे संजय शिरसाट

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2023, 8:06 PM IST

प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar Factory Fire:वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये सनशाइन एंटरप्राइज या हॅण्ड ग्लोज तयार करणाऱ्या कंपनीला आग लागली. या आगीमध्ये 6 कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय, तर 7 जण सुखरूप बाहेर पडल्याने ते बचावले आहेत. हे कामगार बिहार आणि इतर राज्यातून कामासाठी आले होते. कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तास मेहनत करून आगीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेत पोलिसांनी आतापर्यंत तपास केला त्यामधून या सहा जणांचा मृत्यू गुदमरून झाल्याची प्राथमिक नोंद आहे.

चौकशी केली जाणार : आग लागल्यावर प्रचंड धूर झाला. कंपनीमधून बाहेर पडायला जागा मिळाली नाही आणि आगेचा धूर एवढा होता की, त्यामध्ये त्यांना श्वास घेणं शक्य झालं नाही. रात्री काम बंद असते, मात्र कंपनीत काम करणारे बहुतांश लोक तिथेच वास्तव्यास राहतात. याप्रकरणात नियमांची मायमल्ली झाल्याचं दिसत असून त्याबाबत चौकशी केली जाईल अशी माहिती पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी दिलीय.


कंपनीत फायर ऑडिट का नाही? : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी घटनस्थळाची पाहणी केली. या दोघांनी पाहणी करतेवेळेस एमआयडीसी आणि कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत कंपनीत फायर ऑडिट का नाही? असा प्रश्न देखील उपस्थितीत केला. कंपनी ही कामाची जागा असताना मजूर या ठिकाणी कसे झोपले होते? कंपनीतून बाहेर पडण्यासाठी रस्ता का नाही? असं प्रश्न विचारत एमआयडीसी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आहे.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : कंपन्यांची पाहणी होईल हे कामगार विभागाचं काम आहे, मात्र ते किराणा दुकान आणि मिठाईचे दुकान या ठिकाणी जाऊन पाहणी करतात. कुठल्याही कंपनीची पाहणी हा विभाग करत नाही. घटना घडली तिथे जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. ते ज्या खोलीत होते तिथे गॅस, दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळं नियम मोडणाऱ्या कंपनी मालक आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर 302 सह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि संभाजीनगर या तिन्ही ठिकाणी मागील काही दिवसात आग लागल्या असून कामगारांचा जीव एवढा स्वस्त झाला का?, त्यामुळं यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलीय.

हेही वाचा -

  1. विधिमंडळ अधिवेशन 2023 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी तळली भजी, बेरोजगारीकडं वेधलं लक्ष
  2. आगामी लोकसभा निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना 'या' चिन्हावर लढवण्याची शक्यता
  3. Kirit Somayya : किरीट सोमैयांच्या वकिलांची न्यायालयात उडाली भंबेरी, याचिकेत सुधारणा करण्याची उच्च न्यायालयाची परवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details