महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder : पैशाच्या देवाण-घेवाणवरून वाद, ५५ वर्षीय महिलेचा खून - Agarkandgaon in Gangapur taluka

गंगापूर तालुक्यातील अगरकानडगाव येथे उसने पैशाच्या देवाण-घेवाण वरून एका महिलेचा खून करण्यात आला आहे. अलकाबाई शेषराव सोलाट वय ५५ वर्षे असे मृत महिलेचे नाव असून, सोमनाथ ज्ञानेश्वर म्हसारे असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Somnath Dnyaneshwar Mhasare
सोमनाथ ज्ञानेश्वर म्हसारे

By

Published : Apr 23, 2023, 10:48 PM IST

छत्रपती संभाजी नगर ( गंगापूर ) :उसने पैशाच्या देवाण-घेवाण वरून वाद झाल्याने स्कार्पने गळा आवळून महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना गंगापूर तालुक्यातील अगरकानडगाव येथे घडली आहे. रविवारी सकाळी महिलेच्या घरामागील शेतात मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. अलकाबाई शेषराव सोलाट वय ५५ वर्षे असे मृत महिलेचे नाव असून, सोमनाथ ज्ञानेश्वर म्हसारे असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी रात्री महिला शौचास जाते असे सांगून घरातून गेली होती. उशिरापर्यंत महिला घरी न आल्याने मुलाने, सुनेने महिलेचा शोध घेतला. मात्र, महिला मिळून आली नाही. रविवारी सकाळी महिलेचा शोध घेतला असता राहत्या घराच्या मागील शेतात महिलेचा मृतदेह मिळून आला.

दोन तासांच्या आता आरोपीस घेतले ताब्यात :घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते, उपनिरीक्षक दीपक औटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास निंभोरकर, पोलीस हवालदार विजय भिल्ल, पोलीस शिपाई बलवीरसिंग बहुरे, पोलीस शिपाई विजय नांगरे, ज्ञानेश्वर चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला दोन तासात अटक केली आहे.

उसने दिलेल्या पैशाच्या वादातून खून :उसने दिलेल्या पैशाच्या देवाण-घेवाणीवरून महिलेचा स्कार्पने गळा अवळून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. उतरणीय तपासणीसाठी महिलेचा मृतदेह गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. महिलेच्या मुलाच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई :सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते, पोलीस उपनिरीक्षक दीपक औटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास निंभोरकर, विजय भिल्ल, पोलीस अंमलदार बलवीरसिंग बहुरे, ज्ञानेश्वर चव्हाण, विजय नांगरे आदींनी केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक चौरे हे करत आहेत.


हेही वाचा - Sex Racket Busted : मुलींचे कौमार्य तोडण्यासाठी लाखांचा सौदा; सेक्स रॅकेट चालवणाऱया दोघींना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details