महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आयुष्य खूप सुंदर आहे, पण माझ्या आयुष्यात त्रास आहे; फेसबुक पोस्ट करून छावा संघटनेच्या तालुकाध्यक्षाची एसटीखाली आत्महत्या - पैठण औरंगाबाद आत्महत्या न्यूज

अखिल भारतीय छावा संघटनेच्या पैठण तालुक्यातील युवक तालुका अध्यक्षाने एसटी बस समोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने व्यक्तिगत आयुष्यात त्रास असल्याची फेसबुकवर पोस्ट टाकली. महेश शिंदे पाटील असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

MAHESH
MAHESH

By

Published : Aug 19, 2021, 12:38 AM IST

औरंगाबाद - अखिल भारतीय छावा संघटनेच्या पैठण तालुक्यातील युवक तालुका अध्यक्षाने एसटी बस समोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने व्यक्तिगत आयुष्यात त्रास असल्याची फेसबुकवर पोस्ट टाकली. ही धक्कादायक घटना नेवासा-नगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ घडली. या घटनेमुळे पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. महेश शिंदे पाटील (वय 23 वर्षे. रा.आमरापूर वाघूडी, ता.पैठण) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

अशी घडली घटना...

गेल्या काही दिवसांपासून महेश हा तणावात होता. मात्र कोणत्या कारणाने तो तणावात होता? हे त्याने कुणालाही सांगितले नाही. संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याने फेसबुकवर एक पोस्ट केली. 'आयुष्यात खूप त्रास आहे. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका', अशी ती पोस्ट आहे. त्यानंतर काही वेळातच त्याने अहमदनगर-नेवासा महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ दुचाकी बाजूला उभी केली. त्यानंतर भरधाव जाणार्‍या एसटी बस समोर उडी घेत आत्महत्या केली. महेशला नागरिकांनी तातडीने जवळच्या नेवासा शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र गंभीरपणे जखमी झाल्याने व अति रक्तस्त्राव झाला. वैद्यकीय अधिकार्‍यांनीही महेशला मृत घोषित केले. दरम्यान, पैठण जवळील मूळ गाव आमरापूर वाघूडी येथे महेशवर अंतिम संस्कार करण्यात आले.

पोस्टनंतर अनेकांचे कॉल

संध्याकाळी जेव्हा महेशने फेसबुकवर आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकली. ती पोस्ट पाहून त्याचे मित्र, नातेवाईक अशा अनेक लोकांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने आत्महत्येपूर्वी मोबाईल बंद करून ठेवला होता. अनेकांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करून टोकाचे पाऊल उचलू नकोस, अशी विनवणीही केली. मात्र तोपर्यंत त्याने बस समोर उडी घेतली होती.

महेशची अखेरची फेसबूक पोस्ट

महेशची अखेरची फेसबूक पोस्ट

आयुष्य खूप छान आहे पण त्याचे जवळचे लोक sobat असतिल तर माझही आयुष्य खूप सुंदर होत ...

पण मला कदाचित जगता आलं नाही मी माझ्या चुकीमुळे जगलो नाही…

मला जगता आल नाही…khup प्रेमाचे लोक भेटले..माझे मित्र तर एवढे ना की.कोणाचा जीव घेतील मी म्हणलो तर…पण असो…माझ्या आयुष्यात..खूप त्रास आहे…

जो मी konala sangu shakat nhi……pn mazi ek echha ahe mazya मृत्यु ला कोणालाही जबाबदार ठरवू नये…

मी मझ्या त्रासामुळे मरतोय… माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मझ्या जिवलागांना खूप खूप धन्यवाद… thank u so much all

हेही वाचा -घटस्फोटानंतर कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही, नागपूर खंडपीठाचा पतीला दिलासा

ABOUT THE AUTHOR

...view details