औरंगाबाद - अजिंठा लेणी ( Ajanta Caves ) म्हणलं तर एक वेगळी शिल्प आपल्या नजरेसमोर उभा राहतो. जगविख्यात लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेणीला एक वेगळे महत्त्व आहे. ही लेणी म्हणजे बुद्धांचा जन्मापासून ते महानिर्वाणपर्यंत प्रवास ( Buddha's Born to Death Journey ) दर्शवणारी ही लेणी मानली जाते. लेणीसोबतच काही काल्पनिक कथादेखील याठिकाणी साकरल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने ( National Tourism Day 2022 ) ईटीव्ही भारतने अंजिठा लेणीचा घेतलेला हा विशेष आढावा. ( ETB Bharat Ajanta Caves Special Report )
गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित आहेत 30 लेण्या -
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी वाकाटक, गुप्त आणि सातवाहन कालखंडातील आहे. इसवी सन दुसरे शतक ते सातवे शतक या काळात लेण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. परिसरात तीस लेणी असून पूर्ण लेण्या बुद्ध लेण्या आहेत. लेणी क्रमांक 1, 2, 16 आणि 17 बुद्धाच्या जीवनातील जातक कथा चित्रित करण्यात आल्या आहेत. या लेण्यांचे वैशिष्ट्य जर पाहिले तर बुद्धांच्या जन्माच्या आधीपासूनच्या कथा यात रेखाटण्यात आणि चित्रित करण्यात आल्या आहेत. बौद्ध धर्माच्या आधारावर या सर्व कलाकृती आहेत. बुद्धांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणा पर्यंतचा प्रवास या लेण्यांमध्ये अनुभवायला मिळतो. अतिशय कोरीव आणि रेखीव अशा कलाकृती या लेण्यांमध्ये साकारण्यात आल्या आहेत, अशी माहिती इतिहास तज्ञ डॉ. संजय पाईकराव यांनी दिली.
अठराशे 1819 मध्ये लेण्या आल्या जगा समोर -
या लेण्यांची निर्मिती दुसऱ्या आणि सातव्या शतकाच्या काळात झाली असली, तरी या लेण्या जगासमोर इसवी सन 1819मध्ये आल्या. मद्रास रेजिमेंटचे सैन्यातील अधिकारी जॉन स्मिथ शिकारीसाठी अजिंठा परिसरात आले होते. त्यांना वाघाची शिकार करायची होती. एक वाघ त्यांना दिसला आणि त्यांनी त्याला गोळी मारली. मात्र, गोळीचा आवाज आला नाही. त्यामुळे उत्सुकतेपोटी त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस त्यांना पहिल्यांदा अजिंठा लेणी दिसून अली. त्यानंतर या लेण्यांवर त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि परिसर स्वच्छ करत गेले. तर अशा एकेक लेण्यासमोर आल्या आणि जवळपास तीस लेण्या या परिसरात आढळून आल्या. त्यानंतर तेथे स्वच्छता केल्यानंतर या लेण्या जगासमोर आल्या आणि तेव्हापासून आजपर्यंत अजिंठाचे आकर्षण कायम आहे, अशी माहिती इतिहास तज्ञ डॉ. संजय पाईकराव यांनी दिली.