कन्नड - (औरंगाबाद) - कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसात तासंतास भिजूनही यूरिया खत मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहार. यावर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शेतकऱ्यांना तत्काळ खत उपलब्ध करून द्यावा. तसेच खतांचा काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली होती. यामुळे खडबडून जागे झालेल्या कृषी विभागाने तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्राची तपासणी करून खत विक्रत्यांचे परवाने निलंबित केले आहेत.
तालुक्यातील प्रशांत कृषी सेवा केंद्र कन्नड, जय महाविर कृषी सेवा केंद्र नागद, नम्रता फर्टिलायझर नाचनवेल, आर्यन कृषी सेवा केंद्र पिशोर, पंकज एजन्सी चिकलठाण या कृषी सेवा केंद्रांकडून चढ्या दराने खत विक्री, तसेच खत साठा शिल्लक असूनही खत शिल्लक नसल्याचे शेतकऱ्याना सांगणे, जवळच्या व्यक्तिचे आधार लिंकिंग करून यूरिया खताचा तुटवडा निर्माण करणे, अशा तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या.