महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला; प्रहारने भर चौकात जाळली सरपंचांची खुर्ची - पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला; प्रहारने भर चौकात जाळली सरपंचांची खुर्ची

पाणी मिळत नसल्याने आज फक्त खुर्च्या जाळल्या आहेत, मात्र पाण्याची तात्काळ सोय प्रशासनाने केली नाही तर आम्ही ग्रामपंचायत पेटवून देऊ असा इशारा प्रहार संघटनेचे मंगेश साबळे यांनी दिला आहे.

औरंगाबाद; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला; प्रहारने भर चौकात जाळली सरपंचांची खुर्ची
औरंगाबाद; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला; प्रहारने भर चौकात जाळली सरपंचांची खुर्ची

By

Published : Jan 11, 2021, 11:06 AM IST

औरंगाबाद - फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या खुर्च्या भर चौकात पेटवून दिल्याची घटना घडली. गावात गेल्या आठ दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने प्रहार संघटनेने निषेध व्यक्त करत ह्या खुर्च्या पेटवून दिल्या.

आठ दिवसांपासून पाणी नाही...
गेवराई पायदा गावाला जवळ असलेल्या पाझर तलावातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गावात अशुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत होता. या अशुद्ध पाण्यामुळे काही व्यक्ती आजारी पडल्या. परिणामी पाणी पुरवठा बंद करण्यात आला. मात्र त्यांनतर पिण्याची पाण्याची कोणतेही सोय करण्यात आली नाही. तब्बल आठ दिवसांपासून गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळाले नाही. ग्रामसेवक, बीडीओ यांना वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे आज प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांच्या खुर्च्या गावातील भर चौकात जाळत निषेध व्यक्त केला.

अन्यथा ग्रामपंचायत पेटवून देऊ..
पाणी मिळत नसल्याने आज फक्त खुर्च्या जाळल्या आहेत, मात्र पाण्याची तात्काळ सोय प्रशासनाने केली नाही तर आम्ही ग्रामपंचायत पेटवून देऊ असा इशारा प्रहार संघटनेचे मंगेश साबळे यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details