औरंगाबाद - गंगापूर येथे उपचाराअभावी महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी येथील संजीवनी रुग्णालयामध्ये तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यमुनाबाई भड यांच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे त्यांचे निधन झाले. मात्र, योग्य उपचार न केल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार करत नातेवाईकांनी लोकांना गोळा करून रुग्णालयावर हल्ला चढवला. हवा मारायचा पंप, लोखंडी रॉड, लाकडी दांडा व दगडाने रुग्णालयात घुसूनडॉक्टर योगेश गवळी यांची कार, संगणक, एलसीडी, केबिनच्या काचा, काऊंटरवरील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. डॉक्टर गवळी व तेथील कर्मचारी तुषार राजपूत या दोघांना रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.