गंगापूर (औरंगाबाद) -तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा पेरणी करण्यात व्यस्त आहे. खरिपाचा हंगाम सुरू झाला आहे. लॉकडाऊनमुळे आधीच शेती मालाचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. असे असतानाही पेरणीसाठी लागणाऱ्या रासायनिक खते, बियाणांसाठी बळीराजा आर्थिक जुळवाजुळव करून पेरणीच्या तयारीला लागला आहे.
बियाणे खरेदीसाठी कृषी दुकानात शेतकऱ्यांची गर्दी
तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा कृषी दुकानातून, मका, तूर, कापूस, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांच्या बियाणे खरेदीसाठी; तसेच रासायनिक खते घेण्यासाठी दुकानात गर्दी करत आहेत.