महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रियकराच्या आत्महत्येनंतर महाविद्यालयीन तरुणीची गळफास लावून आत्महत्या - Incident in Aurangabad Harsul area

ज्या मुलाशी विवाह ठरला आहे त्या मुलाने १५ दिवसांपुर्वी आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूने तणावात असलेल्या मुलीनेही आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद येथील हर्सूल परिसरात घडली आहे.

खुशी रमेश कलवले (मृत)
खुशी रमेश कलवले (मृत)

By

Published : Jun 20, 2021, 8:13 PM IST

औरंगाबाद - पंधरा दिवसांपूर्वी विवाह ठरलेल्या मुलाने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येच्या तणावातून १७ वर्षीय मुलीनेही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. १९ रोजी समोर आली आहे. खुशी रमेश कलवले (वय १७ रा. गायकवाड हौसिंग सोसायटी एकता नगर जाटवडा), असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. खुशी पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. तसेच, पार्लरचेही काम करत होती.

विवाह ठरलेल्या तरुणाने १५ दिवसांपूर्वीचं केली होती आत्महत्या

खुशीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांना विवाह करायचा होता. यासाठी दोघांनी घरच्यांचे एकमत करून, तीन महिन्यांपूर्वी विवाह ठरवला होता. मात्र, विवाह ठरलेल्या तरुणाने १५ दिवसांपूर्वी आत्महत्या केली. यामुळे खुशी पंधरा दिवसांपासून तणावात होती. दरम्यान, शनिवार दि. १९ रोजी दुपारी आई घराबाहेर दळण करत असताना, खुशीने स्वयंपाक घरात सिलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब आईच्या लक्षात येताच नागरिकांच्या मदतीने खुशीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव जाधव करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details