पैठण- शहरात सध्या वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. जागतिक पर्यावरण संरक्षण दिनाच्या पूर्वसंधेला कावसान येथे गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूचोरी होत असताना नागरीकांना आढळून आले. आठ यारी यंत्राची जुळवनी करुन गोदावरी पात्रात हायवा ट्रक उतरवून वाळूचोरी होत आहे.अशी माहीती नागरीकांनी प्रशासनाला दिली. पुराव्यांसह माहीती मिळूनही प्रशासनाने कारवाईत दिरंगाई केल्याने, प्रशासन यामध्ये सहभागी आहे का? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.
कावसान परिसरातून वाळूचोरी
कावसान येथे जवळपास आठ यारी यंत्र नागरीकांना दिसून आले. गोदावरी नदी पात्रात हायवा ट्रक उतरवून वाळूचोरी होत असल्याची माहिती नागरीकांनी प्रशासनाला दिली. तरीही तहसील प्रशासनाने फक्त एका वाहनावर कारवाई केली आहे. तहसील प्रशासनाला नागरिक या भागात वाळूचोरी होत असल्याची माहिती देतात परंतू अल्पशी रक्कम घेतल्याने या वाळू तस्करांवर कारवाई होत नसल्याचे नागरिकांचा आरोप आहे.