महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदित्य ठाकरे साधणार 'आदित्य संवाद'च्या माध्यमातून युवा मतदारांशी संवाद - आदित्य संवाद

युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे 'आदित्य संवाद'च्या माध्यमातून युवा मतदारांशी संवाद साधणार आहेत.

आदित्य ठाकरे

By

Published : Apr 1, 2019, 5:19 PM IST

औरंगाबाद- निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना वेगळ्या पद्धतीने मतदारांशी संवाद साधाणार आहे. युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे 'आदित्य संवाद'च्या माध्यमातून युवा मतदारांशी संवाद साधणार आहेत. आदित्य संवादची सुरुवात औरंगाबादमधून २ एप्रिलला होणार आहे. राज्यात २४ एप्रिल पर्यंत ५ ठिकाणी 'आदित्य संवाद' कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती युवासेनेच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना आता जनतेशी संवाद साधणार आहे. नवीन मतदारांची संख्या मोठी असल्याने आदित्य संवादच्या माध्यमातून हा संवाद होणार आहे. २ एप्रिलला औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानात युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे १० हजार युवकांशी संवाद साधणार असल्याची माहिती युवसेनेच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

आदित्य ठाकरे साधणार 'आदित्य संवाद'च्या माध्यमातून युवा मतदारांशी संवाद

महाराष्ट्रातील युवकांच्या समस्या, अपेक्षा जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम होणार आहे. युवकांच्या समस्या आणि त्यांची उत्तरे यावर चर्चा आयोजत करण्यात येणार आहे. आदित्य संवादच्या पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरे राज्यातील १५ लाख युवकांशी डिजिटल माध्यमातून संवाद साधणार आहेत. १८ ते ३५ वयोगटातील युवकांसाठी हा खुला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

  1. औरंगाबाद - २ एप्रिल
  2. नाशिक - ७ एप्रिल
  3. कोल्हापूर - १३ एप्रिल
  4. मुंबई - २१ एप्रिल
  5. पिंपरी चिंचवड - २४ एप्रिल

या संवादात युवकांच्या समस्या ऐकल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या हेल्प लाईनचा नंबर युवकांना देण्यात येणार आहे. युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्न करणार आहेत. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यासारखेच आता शिवसेनेतर्फे युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे युवकांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेचे आदित्य संवाद अस्त्र आता युवा मतदारांना आकर्षित करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details