महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aditya Thackeray On Hospital : आरोग्य यंत्रणांची पाहणी करण्यासाठी राजकीय नेते सरसावले, मात्र पुढे काय?...आदित्य ठाकरे - Aditya Thackeray Reaction On Government

Aditya Thackeray On Hospital: नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, ठाणे येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूसत्राप्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाला (Ghati Hospital) भेट दिली. रुग्णसंख्या, औषधांची मागणी, उपलब्ध साठा, रुग्णांना असणाऱ्या असुविधा आणि रिक्त पदांसदर्भात त्यांनी अधिष्ठांताकडून माहिती घेतली. त्यानंतर, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.

Aditya Thackeray News
युवा नेते आदित्य ठाकरे

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 6:01 PM IST

माहिती देताना युवा नेते आदित्य ठाकरे

छत्रपती संभाजीनगर Aditya Thackeray On Hospital: राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याचं समोर आलं आहे. नांदेडच्या घटनेनं राज्यकर्त्यांना विचार करण्यास भाग पाडलं असताना सर्वच राजकीय पक्षांनी शासकीय रुग्णालयांची पाहणी सुरू केली आहे. त्यात ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी घाटी रुग्णालयाची पाहणी (Ghati Hospital) केली. वैद्यकीय अधिष्ठाता यांच्यासोबत सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, त्यांनी समस्या जाणून घेतल्या. याआधी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड,(Bhagwat Karad) राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील,(Dilip Walse Patil) पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी देखील घाटी रुग्णालयात पाहणी करत बैठका घेतल्या. मात्र एवढ्या बैठका घेऊनही शासकीय रुग्णालयाची परिस्थिती सुधारेल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

कारवाई करण्यापेक्षा परिस्थिती समजून घेण्यासाठी आलो : मुंबई, नांदेडमध्ये झालेल्या घटना धक्कादायक आहेत. विरोधक म्हणून आम्ही आंदोलन करू शकतो, मोर्चे काढू शकतो मात्र आम्ही तसं करणार नाही. नेमकी अडचण जाणून घेण्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नागपूर येथील रुग्णालयाचा दौरा करत आहोत. कोणावर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही तर डॉक्टरांना किती अडचणी आहेत ते समजून घेणं महत्वाचं असल्यानं पाहणी करत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. डीपीडीसी मधून येणारा निधी रुग्णालयांना मिळाला नाही म्हणून औषध खरेदी वेळेवर झाली नाही. इतक्या घटना घडल्यावर देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले नाहीत. आरोग्य व्यवस्थेबाबत आम्ही अधिवेशनात आमचे मुद्दे मांडू, पण कोविड काळात आरोग्य यंत्रणा सक्षम होत्या. त्यावेळी दिलेले अधिकार वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले पाहिजे, अनेक रिक्त पदे भरली पाहिजेत असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

चार दिवसात सर्वच नेत्यांच्या भेटी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महत्त्वाचे रुग्णालय म्हणून घाटी रुग्णालय परिचित आहे. मात्र यात रुग्णालयात एकाच दिवशी २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. ही माहिती मिळताच सर्वच राजकीय नेत्यांनी घाटी रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी धाव घेतली. शनिवारी एकाच दिवसात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी एकामागे एक वेगवेगळ्या बैठका घेत आरोग्य यंत्रणेची तपासणी केली. मात्र त्यात आरोग्य यंत्रणेवर दिवसेंदिवस ताण वाढला असून त्यामानाने सुविधा मर्यादित असल्याचं समोर आलं. रुग्णसंख्या वाढली असली तरी त्यांना दाखल करून घेण्यासाठी सुविधा नाही, तर दुसरीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक जागा रिक्त आहेत. या समस्या आजच्या नसून मागील काही वर्षांपासून याच समस्यांवर वारंवार तोंड द्यावे लागत आहे. सर्व माहिती असूनही फक्त गेल्या काही दिवसात बैठकींचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात आज आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. या सर्व पाहणी दौऱ्यांमध्ये निष्पन्न काय होणार? असा प्रश्न निर्माण होतोय. कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये समस्या त्याच आहेत. मात्र त्याचं उत्तर कोणाकडेही सापडलेलं नाही. त्यामुळे या दौऱ्यांचं फलित काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

निवडणूक आयोगावर ताशेरे : निवडणूक आयोगाने चार राज्यांच्या निवडणुकीबाबत पत्रकार परिषद आयोजित केली. त्यादरम्यान दोन लोकसभा निवडणुका सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्या घेणं गरजेचं असल्याचं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. निवडणूक आयोग नेमकं काय काम करतोय हे आम्हाला चांगलंच माहीती आहे, पण लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुका या गरजेच्या आहेत असं असताना देखील राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका अद्याप घेण्यात येत नाहीयेत. त्या देखील घेतल्या गेल्या पाहिजेत अशी आमची भावना आहे असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा -

  1. Aaditya Thackeray : 'शासकीय रुग्णालय' मृत्यूचा सापळा बनलाय का? आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
  2. Aaditya Thackeray Criticizes BJP : माझा तुम्ही 'बाळ' असा उल्लेख केला याचा अभिमान; आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका
  3. Ashish Shelar Criticizes Aditya Thackeray : बाप आजारी असताना सरकारी पैशावर परदेशात मजा मारणार्‍याने शहाणपण शिकवू नये - आशिष शेलार

ABOUT THE AUTHOR

...view details