औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी येथे निवडणूक लढण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर ठाणे येथे निवडणूक लढवण्याचा आव्हान त्यांना दिले. मात्र त्यांनी स्वीकारले नाही आता वार्डात निवडणूक लढवण्याचे त्यांनी सांगितले, ते जर वॉर्डांत निवडणूक लढवायला तयार असतील तर मी देखील लढतो अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तर ते कोणतेच आव्हान स्वीकाराला तयार नाहीत, त्यामुळे आता त्यांना एक नवीन सोप आव्हान देतो ते म्हणजे, अधिवेशन सुरू होण्याआधी त्यांनी राज्यपाल बदलून दाखवावे. महाराष्ट्रात राहून त्यांनी अनेक वेळा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. मात्र त्यावर कोणीही बोलले नाहीत. मुख्यमंत्री दिल्लीला जात होते मात्र ते फक्त स्वतःच्याच कामासाठी जात होते. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
नागरिकांनी दाखवलं:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वरळीतील सभेला नागरिकांनी पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. मात्र कोणाच्या फ्लॉप शोवर बोलणार नाही. वरळी आणि इतरही ठिकाणी नागरिकांनी चित्र दाखवले आहे. प्रामाणिक आणि गद्दार यातला फरक लोकांनी दाखवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का आले नाही? तर ते त्यांना विचारा. ते तर डावस मध्ये देखील गेले नव्हते. वरळी येथील नागरिकांना माहिती आहे, आम्ही त्यांच्या घराघरापर्यंत जाऊन मदत पोहोचवलेली आहे. असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील प्रकल्प बाहेर जात आहेत यावर समोरासमोर बसून चर्चा करा असे सांगितले. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अनेक प्रकल्प आजही जात आहेत असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.