औरंगाबाद - कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार बंद असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही काही ठिकाणी या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. कन्नड तालुक्यातील चिंचखेडा शिवारात औराळा चापानेर येथे शेतात कामगारांचा जमाव जमवून गुऱ्हाळ चालवणाऱ्या सहा जणांवर कारवाई करण्यात आली.
संचारबंदी काळात गुऱ्हाळ चालवणाऱ्यांवर कारवाई - Kannad Corona Lockdown
कन्नड तालुक्यातील चिंचखेडा शिवारात औराळा चापानेर येथे शेतात कामगारांचा जमाव जमवून गुऱ्हाळ चालवणाऱ्या सहा जणांवर कारवाई करण्यात आली. प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे सहा जणांना १२ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे सहा जणांना १२ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भिवसने यांच्या तक्रारीवरून गणेश शेकनाथ आव्हाड (चिंचखेडा खु.), रामेश्वर सुभाष घुले (चिंचखेडा खु.), प्रमोद सुभाष घुले (चिंचखेडा खु.), ओमप्रकाश लक्ष्मण (रा.उत्तर प्रदेश ह.मु. चिंचखेडा खु.), कुलदीप केशव (रा.उत्तर प्रदेश ह.मु. चिंचखेडा खु.) संदीप ओमपाल (रा. उत्तर प्रदेश ह.मु. चिंचखेडा) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या सर्व सहा आरोपींना कन्नड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी दोन हजार रूपये दंड ठोठावला आहे. हा दंड न भरल्यास आरोपींना दोन दिवसांची साध्या कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे. सर्व आरोपी आरोग्याची काळजी न घेता संचारबंदी सुरू असताना शेतात गुऱ्हाळ चालवत होते.