महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#COVID-19: 144 चे पालन केले नाही तर थेट कारवाई होणार...

जिल्ह्यात आतापर्यंत 19 जणांचे नमूने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी एकच रुग्ण पॉसिटीव्ह आहे. तर 9 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. अन्य 9 रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहेत. तर गुरुवारी 23 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात चार संशयित दाखल आहेत.

act-144-applied-in-aurangabad-dur-to-corona-virus
144 चे पालन केले नाही तर थेट कारवाई होणार...

By

Published : Mar 19, 2020, 9:24 PM IST

औरंगाबाद- कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी काळजी घ्या, गर्दी टाळा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केल होते. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने आता कलम 144 लावले जाईल. त्याचे पालन केले नाही तर गुन्हे दाखल करणात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गुरुवारी दिली.

144 चे पालन केले नाही तर थेट कारवाई होणार...

हेही वाचा-निर्भया प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाने दोषी विनय गुप्ताची याचिका फेटाळली

जिल्ह्यात आतापर्यंत 19 जणांचे नमूने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी एकच रुग्ण पॉसिटीव्ह आहे. तर 9 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. अन्य 9 रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहेत. तर आज (गुरुवारी) 23 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात चार संशयित दाखल आहेत. त्यात दोन महिला आणि दोन पुरुष आहेत. वैजापूर येथील पळालेला संशयित जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. मात्र, त्याच्यात कोरोनाची लक्षणे नसल्याने त्याला सोडून देण्यात आले अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

घरातून बाहेर पडू नका, गरज असेल तरच बाहेर पडा, दुसऱ्याशी एक मीटर अंतर बाळगून बोला, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले. पॉझिटिव्ह रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी 23 जणांचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. औरंगाबादमधे आतापर्यंत 193 रुग्णांची तपासणी केली आहे.

कोरोना संसर्ग झालेल्या महिलेच्या घराच्या जवळील परिसराची पाहणी केली. मात्र, कुठलाही धोका नसल्याचे दिसून आले. महानगर पालिकेच्या माध्यमातून शहरात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. ज्यामध्ये मुख्य बसस्थानकावर 636, सिडको बसस्थानकावर 247, रेल्वे स्टेशन 500 आणि नगरनाका येथे 428 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यात एकूण 1816 लोकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती महानगर पालिका आरोग्य अधिकारी यांनी दिली. कोरोना बाधित महिला रुग्ण राहत असलेल्या परिसरात 2906 घरांची तपासणी केली. 32 रुग्णांवर प्राथमिक उपचार केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details