औरंगाबाद - लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केलेल्या व्हिडिओचे चित्रीकरण केले. लग्न मोडण्यासाठी पीडितेच्या भावी पतीला शारीरिक संबंधाचे व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी रविंद्र दाभाडे (३६, रा. सिद्धार्थनगर, टिव्ही सेंटर, हडको) याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
औरंगाबादेत अत्याचारी पोलीस शिपायाला अटक - aurangabad letest news
लग्न मोडण्यासाठी पीडितेच्या भावी पतीला शारीरिक संबंधाचे व्हिडिओ पाठवल्याचे प्रकरण औरंगाबादेत समोर आले होते. याप्रकरणी आरोपी पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे.
हडको भागातील एका २४ वर्षीय तरुणीला पोलीस शिपाई रविंद्र दाभाडे याने लग्नाचे अमिष दाखवत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यासाठी २०१५ ते २०२० याकाळात तिला वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तो घेऊन गेला. तरुणीच्या नकळत शारीरिक संबंधांचे व्हिडिओ तयार केले. त्यानंतर एकेदिवशी तरुणीचा साखरपुडा झाला. त्याचदिवशी तिला पुन्हा रेल्वे स्टेशनच्या एका हॉटेलात दाभाडेने बोलावून घेतले. तत्पूर्वी तिला व्हिडिओ चित्रीकरण केल्याचे खोटे सांगत पुन्हा शारीरिक संबंध केले. त्याच शारीरिक संबंधाचे व्हिडिओ त्याने तरुणीच्या भावी पतीला पाठवले. त्यामुळे तरुणीचे लग्न मोडले होते. याप्रकारानंतर तरुणीने पोलिसात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली नव्हती. पुढे न्याय मागण्यासाठी ही तरुणी महिला तक्रार निवारण केंद्रातही गेली होती. पण तेथे सुद्धा तिच्या पदरी निराशाच आली. अखेर १ ऑगस्टला तरुणीने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेत प्रकरण सांगितले. नंतर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या अनुषंगाने दाभाडेला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याला सोमवारी अटक करण्यात आली.