औरंगाबाद - किरकोळ वादातून शेजारी महिलेचे घर जाळल्याची घटना मुकुंडवाडीतील संजयनगर भागात घडली. या आगीत सुमारे पावणे दोन लाखांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. आनंद निकाळजे या संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
किरकोळ वादानंतर जाळले शेजाऱ्याचे घर, आरोपी फरार - burnt
आनंद निकाळजे या संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा -...तर मुख्यमंत्र्यांना दालनात कोंडू, तृप्ती देसाईंचा इशारा
रुखसाना भिकन शेख (रा. संजयनगर) या जालण्यात नातेवाईकाच्या अंत्यविधीला कुटुंबासह गेल्या होत्या. रात्री घरी परतल्यानंतर त्या मुलीसह स्वयंपाकघरात काम करत असताना त्यांचा आरोपीसोबत वादविवाद झाला. घाबरलेल्या शेख रात्री घराला कुलूप लावून रोहिदासपुरा येथे बहिणीच्या घरी झोपायला गेल्या. दरम्यान, मध्यरात्री ३ च्या सुमारास त्यांचे राहते घर जाळल्याची माहिती त्यांना मिळाली. शेख जेव्हा कुटुंबीयांसह घरी पोहोचल्या तेव्हा संपूर्ण घर भस्मसात झाले होते.