औरंगाबाद- राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. यामुळे ऑक्सिजन व रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे. परिणामी काही जण रेमडेसिवीरचा काळाबाजार करत असून अशीच एक घटना औरंगाबाद येथे घडली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन चोरून विक्री करणाऱ्या सात जणांच्या औरंगाबाद गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून पाच रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले करण्यात आले आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेच्या पथकाला शहरात चोरट्या पद्धतीने इंजेक्शनची विक्री केली जाते आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यावरुन यावेळी बनावट ग्राहक तयार करून दिनेश नावगिरे याला फोन करून इंजेक्शनची मागणी केली. यावेळी दिनेशने 20 हजार रुपये किंमतीप्रमाणे मिळेल, असे सांगितले. यावेळी बनावट ग्राहकाने ठीक आहे म्हणत कुठे येऊ अशी विचारणा केली. यावेळी दिनेश याने घाटी रुग्णालयातील निवासी वस्तीगृह येथे बोलावले. यावेळी दिनेश नावगिरे येला रंगेहाथ पकडले.
टोळीतील आरोपी