महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर अपघात, एकाचा मृत्यू - Aurangabad accident news

औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय माहा मार्गावर गल्ले बोरगाव येथे अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

accident-on-aurangabad-solapur-national-highway
औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर अपघात, एक जण ठार

By

Published : Jan 22, 2020, 7:54 AM IST

Updated : Jan 22, 2020, 10:31 AM IST

औरंगाबाद - राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद - सोलापूरवर गल्ले बोरगाव येथे अपघाता झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना गल्ले बोरगाव येथे घडली.विजय रामराव बोडखे (वय.२८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते कन्नड तालुक्यातील देभेगाव येथील रहीवासी आहे. या संबधित अज्ञात वाहनधारकाविरोधात गल्ले बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात रात्री 9च्या सुमारास गल्ले बोरगाव येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर अष्टविनायक समोर झाला. कन्नड तालुक्यातील देभेगाव येथील रहिवासी असलेले विजय रामराव बोडखे हे दुचाकी (क्रमांक एमएच 20 ए.यू.5832) वरुण गल्ले बोरगावकडे येत होते. तर कन्नडकडून औरंगाबादकडे अज्ञात वाहन जात होते. याच वेळी गल्ले बोरगाव जवळील खड्डे चुकवन्याचा प्रयतनात असताना दुचाकीची व ट्रकची जोरदार धडक झाली. अपघात एवढा जबरदस्त होता की यात दुचाकिस्वाराच्या अंगावरून ट्रक गेला. अज्ञात वाहनाने विजय बोडखे याला चिरडलयाने तो जागीच ठार झाला. अपघाता नंतर ट्रकचालक फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण, पोलिस बिट जमादार एस.सी.धस, बी.एस जाधव, अमर अळनकर, शरद दळवी याच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पघाताची नोंद खुलताबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. खुलताबाद पोलीस अधिक तपास करत आहेत.

Last Updated : Jan 22, 2020, 10:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details