कन्नड (औरंगाबाद):-कन्नड शहराजवळ पिशोर महामार्गावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या क्रुझर जीप व टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींना कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
गणेशपूर येथून खापरखेडा येथे लग्न संमारंभासाठी जात असलेली क्रुझर जीप (एमएच१६आर ४४९६) व कन्नडहून पिशोरकडे येत असलेला टाटा टेम्पो ४०७ (एम एच१०के ७७२४) या दोघांची पिशोर महामार्गावर समोरा समोर धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की, जीपमधील प्रवासी बाहेर फेकले गेले. या धडकेनंतर जीपचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही सामावेश आहे. यातील जखमींना कन्नड येथे ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदर अपघातामधील मयत व्यक्तींची नावे
1) गोकुळ संतोष काकरवाल वय 16 वर्षे (गणेशपूर)
2) शांताराम संतोष पवार (वय 35) चिंचोली लि.