गंगापूर (औरंगाबाद) -गंगापूर-वैजापूर महामार्गावर सकाळी १० वाजेच्या सुमारास गंगापूर शहराच्या एक किलोमीटर अंतरावरावरील थोरात पेट्रोल पंपाजवळ टेम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने अपघात घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू झाला. अब्दुल हक अब्दुल रशीद कुरेशी, असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो मन्सुरी कॉलनी गंगापूर येथील रहिवासी आहे.
टेम्पो चालकाला अटक -
गंगापूर वैजापूर महामार्गावरील थोरात पेट्रोल पंपाजवळ वैजापूरच्या दिशेने येणाऱ्या टेम्पो क्रमांक एमएच २० ईएल ०३२९ व मोटरसायकल क्रमांक एमएच २० जी ७८१२ यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात अब्दुल हक अब्दुल रशीद कुरेशी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच या धडकेत टेम्पो रोडच्या खाली ४० ते ५० फूट लांब खड्ड्यात जाऊन पडला. दरम्यान, पिकप गाडी चालक शरद रुपटके याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा -Pocket Ventilator.. या शास्त्रज्ञाने केवळ 20 दिवसांत बनवला खिशात बसणारा व्हेंटिलेटर