महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बसची बैलगाडीला धडक: शेतकरी गंभीर जखमी, औरंगाबाद-जळगाव महामार्गावर अपघात - st bus accident

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर एसटीने रस्त्यावर चाललेल्या बैलगाडीला पाठीमागून धडक दिल्याने बैल गाडीवरील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. तसेच  बैलांना जबर मार लागल्याने त्यांना दुखापत झाली आहे.

बसच्या धडकेच शेतकरी गंभीर जखमी; औरंगाबाद-जळगाव माहामार्गावर अपघात

By

Published : Nov 19, 2019, 4:19 PM IST

औरंगाबाद -औरंगाबाद-जळगाव महामार्गावर एसटीने रस्त्यावर चाललेल्या बैल गाडीला मागून धडक दिल्याने बैल गाडीवरील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. तसेच बैलांना जबर मार लागल्याने त्यांना दुखापत झाली आहे. ही घटना सिल्लोड तालुक्यातील भवन गावातील पूर्णा नदीवरील पुलावर घडली.

बसच्या धडकेच शेतकरी गंभीर जखमी

हेही वाचा - मुंबईत स्वस्तात सोने विक्रीच्या बहाण्याखाली लुटणारी टोळी सक्रिय; दोघांना अटक

सकाळी नेहमीप्रमाणे भवन येथील शेतकरी रामेश्वर तुपे हे शेतात जात असताना सिल्लोड आगारची बस (क्रमांक एमएच 20 बीएल 3592) सिल्लोडहून पुण्याकडे जात असताना हा अपघात झाला.

घटनेत बैल गाडीवरील शेतकरी रामेश्वर तुपे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. तर बैल जोडीला गंभीर मार लागला असल्याचे पशु वैद्यकिय अधिकारी डॉ. बळीराम गायकवाड यांनी सांगितले. बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

हेही वाचा - नांदगाव शहरातून दुचाकी चोरास अटक; १४ मोटारसायकली हस्तगत

ABOUT THE AUTHOR

...view details