औरंगाबाद - काँग्रेसमधील राज्यातील नेत्यांनी आमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला असला तरी केंद्रातील नेत्यांनी मात्र साथ सोडल्याने काँग्रेस आमच्या सोबत नसल्याचे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी केला. याबाबत आपण काँग्रेस पक्षातील नेत्यांशी बोलणार असून मतांचे विभाजन झाले तर पुन्हा सेना भाजप सत्तेत येईल. त्यामुळे आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला. जागा वाटप करताना मला अनेक वेळा पळवले. मात्र आघाडीसाठी मी प्रयत्न केले. परंतू भिवंडीच्या जागेवर केंद्रातील काँग्रेसच्या एका नेत्याने परस्पर उमेदवार उभा केल्याने समस्या उभी राहिली असल्याचे अबू आजमी यांनी सांगितले.
काँग्रेसच्या केंद्रातील नेत्यांमुळे आघाडीत बिघाडी; समाजवादी नेत अबू आजमी यांचा आरोप - abu aajami
आमची लढाई भाजप सोबत आहे. आम्ही आमच्या जागा कमी करून लढत आहोत. मात्र काँग्रेसने एका जागेसाठी साथ सोडली त्याच दुःख आहे. देशात विकास थांबला आहे. त्यामुळे विकसित देशाच्या यादीतून भारत बाहेर पडला असल्याचे देखील अबू आजमी म्हणाले.
शरद पवार आता मोठ्या प्रमाणात विरोधात प्रचार करत असल्याने त्यांच्यावर ईडीची चौकशी लावली आहे. मात्र सत्य समोर येईल. साध्वी प्रज्ञा सिंह अद्याप निर्दोष सुटलेली नाही ती जामिनावर आहे. तरी तिला निवडणुकीत निवडणून आणले. तसेच तिच्या माध्यमातून काही विधान केली जात आहेत. या जागी एखादा मुस्लिम व्यक्ती असता तर त्याच्यावर अनेक आरोप या लोकांनी केले असते, असा आरोपही अबू आजमी यांनी औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. औरंगाबाद पूर्वचे समाजवादी पक्षाचे उमेदवार कलीम कुरेशी यांच्या प्रचारासाठी अबू आजमी शहरात आले होते.
आमची लढाई भाजप सोबत आहे. आम्ही आमच्या जागा कमी करून लढत आहोत. मात्र काँग्रेसने एका जागेसाठी साथ सोडली त्याच दुःख आहे. देशात विकास थांबला आहे. त्यामुळे विकसित देशाच्या यादीतून भारत बाहेर पडला असल्याचे देखील अबू आजमी म्हणाले. समाजवादी पक्ष तीन जागांवर ताकतीने लढत आहे. समाजवादी पक्ष सर्व जाती धर्माला घेऊन सोबत जात आहेत. अनेक मुस्लिम युवक दोषी नसताना जेलमध्ये आहेत. आम्ही त्यांच्यासाठी लढत आहोत. पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोनच व्यक्ती देश चालवत आहे. गृहमंत्री स्वतः त्यांच्या राज्यातून तडीपार आहेत. अमित शहा आणि मोदी मुस्लिम समाजाच्या नावावर राजकारण करत आहे असल्याचा आरोपही त्यांनी केला. सर्वच ठिकाणी मुस्लिम समाजाला घाबवरण्याचे काम सुरु आहेत. प्रत्येक ठिकाणी धर्मा मध्ये आणत आहेत. राजनाथ सिंह यांनी राफेलची पूजा केली तिथे देखील धर्म मध्ये आणला असा आरोप अबू आजमी यांनी सरकारवर केला.