औरंगाबाद- काँग्रेसचे सिल्लोड मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांचे पुत्र अब्दुल समीर यांनी युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देत असताना पक्षामध्ये अल्पसंख्यांक समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समीर सत्तार यांनी केला आहे.
अब्दुल सत्तारांच्या पुत्राने दिला युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा - sillod
अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी केली. वडिलांची हकालपट्टी होताच समीर सत्तार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.
समीर सत्तार यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडे सुपूर्त केला. शिवाय समीर सत्तार यांनी पक्षदेखील सोडल्याची माहिती दिली आहे. अब्दुल समीर यांच्याशी संपर्क साधला असता, निवडणुकीच्या काळात युवा प्रदेशाध्यक्ष असताना आपल्याकडे कुठलीही जबाबदारी पक्षाने दिली नाही. अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंड पुकारले. इतकेच नव्हे तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला. सत्तार यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी केली. वडिलांची हकालपट्टी होताच समीर सत्तार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुढील दिशा लवकरच जाहीर करू असे समीर सत्तार यांनी सांगितले.