महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तारांनी पक्ष सोडताच काँग्रेस भवनला दिलेल्या ३०० खुर्च्या नेल्या परत - औरंगाबाद

काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी शहागंज येथील काँग्रेस भवनला दिलेल्या खुर्च्या परत नेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहाय्यक यांनी या खुर्च्या परत नेल्या आहेत.

काँग्रेस भवन

By

Published : Mar 26, 2019, 3:34 PM IST

Updated : Mar 26, 2019, 5:26 PM IST

औरंगाबाद-काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी शहागंज येथील काँग्रेस भवनला दिलेल्या खुर्च्या परत नेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहाय्यक यांनी या खुर्च्या परत नेल्या आहेत. २००८ मध्ये अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस भवनला ३०० खुर्च्या दिल्या होत्या.

अब्दुल सत्तार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या खुर्च्या या परत नेल्याने ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेस भवनचा भव्य हॉल रिकामा पडला आहे. त्यामुळे काँग्रेसला आपल्या कार्यकर्त्यांची बैठक ही राष्ट्रवादी भवनमध्ये घेण्याची वेळ आली आहे. काँग्रेसतर्फे आमदार सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली. या घोषणेनंतरकाँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी बंडाचा झेंडा उगारत, अपक्ष उमेदवारी जाहीर केली. इतकच नाही तर त्यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याची घोषणा देखील त्यांनी केली.

रविवारी अचानक अब्दुल सत्तार यांच्या स्वीय सहाय्यकाने सत्तार यांनी दिलेल्या ३०० खुर्च्या परत नेल्या.सत्तार यांच्या या कृत्याने निश्चितच काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. नगराध्यक्ष, आमदार असे अनेक पद काँग्रेसमुळेभूषवणाऱ्या सत्तार यांनी असे करावे का असा प्रश्न काँग्रेसच्या गोटातून उपस्थित केला जात आहे.

Last Updated : Mar 26, 2019, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details