औरंगाबाद -वादग्रस्त विधान करणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांचं कार्यकर्त्यांनी गुलाबाच्या पाकळ्या उधळून स्वागत केलं आहे. राजकीयवादा नंतर प्रथमच कृषिमंत्री अब्दुल सत्तार विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी राजकीय वक्तव्य करण्यास नकार दिला. मात्र सुभेदारी विश्रामगृह (Subhadari Rest House) येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करून त्यांचं जोरदार स्वागत केलं.
Abdul Sattar : बेताल 'शेठ'चे फुलांच्या वर्षावात स्वागत - औरंगाबाद मध्ये सत्तार
वादग्रस्त विधान करणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांचं कार्यकर्त्यांनी गुलाबाच्या पाकळ्या उधळून स्वागत केलं आहे. सुभेदारी विश्रामगृह (Subhadari Rest House) येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करून त्यांचं जोरदार स्वागत केलं.
त्या वक्तव्यानंतर पहिल्यांदा सत्तार शहरात -राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्या बाबत बेताल वक्तव्य कृषिमंत्री सत्तार यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले आहेत. शिंदे गटातील नेत्यांनी त्या वक्तव्याचा समर्थन करण्यास नकार देत अशा पद्धतीचे वक्तव्य करू नका अशी तंबी सत्तार यांना दिली होती. तर भाजपकडून देखील त्यांची कान उघडणी करण्यात आली होती. या राजकीयवादा नंतर पहिल्यांदाच कृषिमंत्री अब्दुल सत्तार विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी दाखल झाले होते.