औरंगाबाद- महिन्यापूर्वी सत्तेत आलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज (सोमवारी) मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळात मराठवाड्यातून धनंजय मुंडे, अमित देशमुख यांच्यासह औरंगाबादमधून अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
औरंगाबादला दोन मंत्रिपदे; अब्दुल सत्तार अन् संदीपान भुमरेंची वर्णी
अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे, तर संदीपान भुमरे पैठणचे शिवसेना आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला रामराम करत विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला, तर संदीपान भुमरे शिवसेनेकडून पाच वेळा आमदार झाले आहेत.
हेही वाचा-'कर्नाटकातील मराठी बांधवांच्या आम्ही पाठीशी; मराठी बांधवांवर अत्याचार करू नये'
अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे, तर संदीपान भुमरे पैठणचे शिवसेना आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला रामराम करत विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला. तर संदीपान भुमरे शिवसेनेकडून पाच वेळा आमदार झाले आहेत. औरंगाबादमधून अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ आणि प्रदीप जैस्वाल यांची नावे चर्चेत होती. औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच नऊच्या-नऊ जागांवर युतीचे उमेदवार निवडून आले. त्यात शिवसेनेचे सहा, तर भाजपच्या तीन आमदारांचा समावेश आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या सत्तारांना मंत्रिपद मिळणार याबाबत अनेक दिवसांपासून खात्रीलायक चर्चा होतीच. मात्र, भुमरे आणि शिरसाठ यांच्यामधे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो याबाबत उत्सुकता होती. मात्र, कट्टर शिवसैनिक मानल्या जाणाऱ्या भुमरे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याच निश्चित झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. आता या मंत्र्यांना कोणते खात दिले जाते याची उत्सुकता औरंगाबादच्या नागरिकांमध्ये दिसून येत आहे.